आज गांधीजींची मयंती आहे. नथुराम गोडसे नावाच्या एका मराठी व्यक्तीने त्यांची गोळ्या घालून हत्या केली. गोडसे ने गुन्हा केला, त्यावर खटला झाला, दोषींना शिक्षा झाली.
पण गांधीजींनी आयुष्यभर मिरवलेली अहिंसा किती विश्वासघातकी आणि दुटप्पी आहे, हे तेव्हा महाराष्ट्राने पाहिलं. त्या एका गोडसेची जात चित्पावन ब्राह्मण आहे, म्हणून सरसकट सगळ्या ब्राह्मण समाजावर ठिकठिकाणी जीवघेणे हल्ले झाले. गांधीहत्येच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात 50 निरपराध चित्पावन ब्राह्मणांना गांधींच्या अहिंसावादी जमावाने ठार मारलं. पुण्याच्या बाहेरच्या एका खेड्यामध्ये तर एका कुटुंबाला जिवंत जाळण्यात आलं. कारण त्यांचं आडनाव गोडसे होतं. कोल्हापूर, सातारा, पश्चिम विदर्भ, मुंबई सगळीकडे पाहता पाहता man hunt सुरू झाली. चिन्हीत करून सुमारे 12000 ब्राह्मण समाजाच्या लोकांच्या हत्या करण्यात आल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धाकट्या भावाची सुद्धा याच दरम्यान हत्या झाली. त्यांच्या घरावर दगडफेक झाली
त्याहून मोठी गोष्ट ही, की यावर तात्काळ कारवाई करण्याचं सोडून सत्ताधारी पक्षाने नीच पातळीवर राजकारण केलं. ब्राह्मणांच्या या हत्याकांडाला मराठे जबाबदार आहेत असा अपप्रचार करण्यात आला. कित्येक ब्राह्मण कुटुंबात अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवला जातो, विकिपीडियावर अजूनही हेच narrative पसरवलं जातं.
पण ह्या दाव्यात काय तथ्य आहे याचा आपण विचार केलाय का? 1948 ला सगळ्यांकडे साधे टेलिफोन सुद्धा नव्हते. न सोशल मीडिया, न TV.
होता तर फक्त रेडिओ आणि वृत्तपत्र. या दोन्ही गोष्टींवर मत मांडण्याचा अधिकार सामान्य व्यक्तीला नसतो. त्यामुळे आजच्या सारखं काहीतरी viral होऊन दंगे होणं तेव्हा शक्य नव्हतं. त्याकाळात होणारे दंगे यांमध्ये संघटनांचा मोठा role असायचा. आणि महाराष्ट्रभर पसरलेली एकही व्यापक मराठा संघटना त्याकाळी नव्हती. हा झाला पहिला मुद्दा.
बरं ब्राह्मण मराठ्यांचा वाद हा काही तेव्हा नवीन नव्हता. कोल्हापूरच्या शाहू महाराजांना त्यांच्या राजपुरोहिताने उघडपणे वैदिक पूजा करणार नाही असं म्हणत नकार दिला. ह्या वेदोक्त प्रकरणावरून शाहू महाराजांचे आणि टिळकांचे वाद झाले. पण तेव्हा कधी असा नरसंहार झाला नाही, ह्या मराठी मातीत विचाराला विचाराने उत्तर दिलं जातं. शत्रूच्या प्रदेशातल्या सुद्धा निरपराध लोकांच्या कधी आम्ही कत्तली केल्या नाहीत. आणि आपल्या माणसांच्या स्त्रियांवर आडनाव पाहून मराठे हात टाकणार? मराठ्यांना indirectly जिहादी ठरवलं गेलं आणि आधीपासूनच असलेला ब्राह्मण मराठा वाद मिटवण्याऐवजी वाढवला गेला.
पण प्रश्न पडतो, की शाहू महाराजांशी ब्राह्मणांनी वाद घातल्यावर मराठे अधर्माने वागले नाहीत. मग गांधींचा त्यांना एवढा पुळका कसा आला? शिवाजी महाराजांना पथभ्रष्ट देशभक्त म्हणणाऱ्या गांधींचा मृत्यू झाला, म्हणून मराठ्यांना एवढा पुळका कसा आला की ते थेट ब्राह्मणांचे घरं जाळत सुटले?
तात्पर्य हे, की मोठ्या राजकीय संघटनेच्या पाठिंब्याशिवाय हे काम शक्य नव्हतं. ह्या राजकिय संघटनेने जाणीवपूर्वक आणि सुनियोजित प्रकारे हत्याकांड घडवलं आणि आरामात दोष मराठ्यांवर टाकून जातीय फूट पाडली. तसंही इंग्रजांकडून Divide and Rule चा धडा ह्या संघटनेने फार छान शिकलेला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते द्वारका प्रसाद मिश्र आपल्या पुस्तकात लिहितात, की 1948च्या ब्राह्मण हत्याकांडात काँग्रेसचे ब्राह्मणेतर कार्यकर्तेच मोठ्या प्रमाणात सहभागी होते. ह्यात सहभागी असलेले लोक मराठे, किंवा इतर कोणत्या एका जातीचे प्रतिनिधी म्हणून आलेले नव्हते, तर त्या पक्षाचे आणि अहिंसक गांधींचे समर्थक म्हणून आलेले होते. तेव्हा मीडियावर सरकारचे संपूर्ण प्रभुत्व असल्याने हा विषय दाबून टाकण्यात आला.
पण आज परिस्थिती वेगळी आहे.
"सोया हुआ सनातन चैतन्य है, सजग है
वो वक्त कुछ अलग था, ये वक्त कुछ अलग है"
(मनोज मुंतशीर)
आता हिंदू समाजाला ही गोष्ट लक्षात यायला लागली आहे, की आपला द्वेष करणारे घटक नेहमी एक जात टार्गेट करतात. आणि इतर जाती थंड बसून राहतात. यामुळेच आपण दुबळे पडत आलो. आधी ब्राह्मणांना पिठमागे म्हणून हिणवलं, आज तीच द्वेषाची मानसिकता मराठ्यांना पराठे म्हणून हिनवत आहे. उद्या कदाचित धनगरांचा, मग तेली, कोळी, कोमटी, मारवाडी, कोणाचाही नंबर येऊ शकतो. ह्यावर उपाय एकच आहे. कोणत्याही जातीच्या हिंदुबांधवांवर अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला आवाज उठवायला हवा. हिंदू समाजात तेढ निर्माण करून राजकारण करणारे घटक ओळखून त्यांचा सर्वनाश करायला हवा.
काश्मिरी पंडित जेव्हा स्वतःचं घरदार सोडून परागंदा झाले, एकटे पडले तेव्हा ह्या महाराष्ट्राने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. आणि त्याच महाराष्ट्रात ब्राह्मण समाजावर गांधी हत्येनंतर प्रचंड अत्याचार झाले, ही आपल्यासाठी खरोखर शरमेची गोष्ट आहे. ढोंगी अहिंसेच्या हिंसेत बळी गेलेल्या निरपराध ब्राह्मणांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
भूतकाळात ज्या जातीमुळे पडलेल्या जखमा आहेत, त्यांवर फुंकर घालायची हीच वेळ आहे. जुने पुराणे वाद मिटवण्याची आणि हिंदवी अस्मितेसाठी एकत्रित होण्याची हीच वेळ आहे. त्याशिवाय हिंदुत्वाचा सूर्योदय अपूर्ण ठरेल. जय श्रीराम, जय शिवराय🚩
- प्रथमेश चौधरी
0 Comments