शैक्षणिक हिंदुफोबिया : सावधान!


जळगावच्या एका कॉलेजमध्ये नारद मुनींना जोकर स्वरूपात दाखवण्यात आले. बुढा खुसट व अनेक अशोभनीय शब्द वापरले गेले. पण हे एकच प्रकरण नाही.


मागच्या काही वर्षांपासून अशा विचलित करणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. दरवर्षी शाळेच्या Annual Gathering किंवा कॉलेज-फेस्ट मध्ये कुठे न कुठे अशी नाटकं (play) सादर केली जात आहेत, ज्यामध्ये आपल्या देवी देवतांचे, ऋषी मुनींचे पात्र घेऊन त्यांना अपमानकारक पद्धतीने दाखवलं जात आहे. 


दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये अशाप्रकारची अनेक कृत्य घडल्याचा बातम्या समोर आल्या आहेत. 


पुणे, नाशिक, छ.संभाजी नगरमधील व इतर ठिकाणच्या अनेक कॉलेजांमध्ये तसेच inter-college स्पर्धांमध्ये अशा प्रकारचा propaganda सर्रास सुरू असतो. माध्यम बदलत जातात. कधी कवितेच्या माध्यमातून, कधी नाटकाच्या तर पथनाट्याच्या (स्ट्रीट प्लेच्या)  माध्यमातून हिंदुफोबिया पसरवला जातो. 


अभाविप व त्या सारख्या अनेक संघटना याविरोधात आवाज उठवतात. पेपरात व सोशल मीडियात त्या शाळा/ कॉलेजविरुद्ध वातावरण तापायला लागतं. मग तिथला कोणीतरी जबाबदार माणूस माफी मागतो. आणि विषय तिथेच थांबतो. परत काही महिन्यांनी वेगळ्या शहरात, वेगळ्या संस्थेत हेच repeat होतं. 


अनेकदा याला राजकीय विरोधाशी जोडल्या जातं. पण नारद मुनी, श्रीरामचंद्र, सीतामाता हे सर्व काय कोण्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. आमचं श्रद्धास्थान आहेत. ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी खुशाल आपापल्या मनानुसार वागा, पण सार्वजनिक ठिकाणी आम्ही द्वेष खपवून घेणार नाही. ही अगदी साधी सरळ गोष्ट आहे.


आपल्याला अशा बातम्या वाचून वाटतं की समोर बसलेले हिंदू विद्यार्थी किती मुर्दाड/ झोपलेले म्हणावेत ज्यांना हा धार्मिक द्वेष दिसत नाही. पण वास्तव तसं नाहीये. Audience मधले धर्माभिमानी विद्यार्थी वेगाने जागे होत आहेत, पण जागं झाल्यावर करायचं काय हे त्यांना ठाऊक नसतं. प्रत्येकाकडे स्टेजवर जाऊन उघडपणे विरोध करण्याची daring नसते, व एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर डाव्यांच्या nexus द्वारे त्या विद्यार्थ्याला सामाजिकरित्या discredit केलं जातं. मी स्वतः सुद्धा cancel culture ची ही गोष्ट कॉलेजमध्ये असताना अनुभवली आहे. (नंतर त्या ट्रोल करणाऱ्यांचं दुकान बंद पडलं तो भाग वेगळा😂)


पण हा एक गंभीर प्रश्न असून यावर एक कायमचा उपाय करणं गरजेचं आहे. सुदैवाने यावर उपाय करण्यासाठी लागणारं सामाजिक संस्थांचं मनुष्यबळ व शासकीय पाठिंबा आज उपलब्ध आहे. मग काय उपाय करता येईल? पाहूया पुढच्या भागात.


- प्रथमेश चौधरी


Post a Comment

0 Comments