शैक्षणिक हिंदुफोबियाच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की अनेक ठिकाणी हिंदुच्या श्रद्धेचा नाटक, स्ट्रीट प्ले, कविता यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक अपमान होत आहे. तसेच याविरोधात कारवाई करण्याऐवजी कॉलेजमधील प्रोफेसर बघ्याची भूमिका घेत आहेत.
अशा घटनांना विरोध शैक्षणिक संस्थेच्या आतून व्हायला हवा. अन्यथा काही विद्यार्थी संघटना पॅनिक होऊन घोषणाबाजी करतात, कोणाच्या तरी तोंडाला काळं फासतात, कॅम्पस मध्ये पोलीस बोलावले जातात आणि मीडियामध्ये त्या संघटनेचं नाव खराब होईल याची पूर्ण काळजी घेतली जाते. म्हणजे ज्यांना धार्मिक सलोखा टिकवून ठेवायचा आहे, त्यांना hindutva goons ठरवून बातमी छापली जाते.
या एकंदर प्लॉट मध्ये डाव्या विचारसरणीचं विद्यापीठात पसरलेलं जाळं काम करत असून त्यांना सरकार कोणाचंही आलं तरी फरक पडत नाही. दुसरी slide बघा. उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद मध्ये घडलेली घटना, ज्यात ऑडियन्स ने जय श्री राम म्हंटलं म्हणून स्टेजवरचा फ्रेशर सुद्धा जय श्री राम बोलला, पण हे ऐकून शिक्षिका खवळली आणि "Get Out" म्हणत त्याला रागवायला लागली. का? ज्या रामाने कधी शत्रूचाही द्वेष केला नाही, त्याच्या नावाचा एवढा द्वेष कशासाठी? आणि तेही हिंदुत्वाच्या विचारावर चालणारं पूर्ण बहुमताचं सरकार असताना! द्वेष करण्याची एवढी हिंमत कुठून येते? ही हिंमत सर्वात आधी नष्ट करावी लागेल.
याच हिंमतीच्या जोरावर लेक्चर सुरू असतानाही असंबद्ध मुद्द्यावर हिंदुफोबिया पसरवला जातो. कधी "देशमुख देशपांडे सुद्धा बलात्कारी होते" अशी comment पास केली जाते, कधी संतांच्या विचारांना manipulate केल्या जातं, तर कधी प्रश्नपत्रिकेत देवी देवतांचा अपमान करणारे scenario देऊन word problems विचारले जातात. त्यामुळे हे लक्षात घ्या, की हा शैक्षणिक हिंदुफोबिया एक दोन घटनांपुरता मर्यादित नसून नियोजनबद्ध प्रक्रियेचा भाग आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर थांबवली पाहिजे.
प्रत्येक ठिकाणी आमची संघटना पोहोचेल, आम्ही आंदोलन करू आणि संबंधितांना माफी मागायला लावू! हे विचार किती वेळा ऐकून घ्यायचे आहेत? जर प्रोफेसरने कोणत्याही भारतीय धर्माबद्दल तर्कहीन द्वेष पसरवला, तर त्याला कायमचं घरी बसवण्याची व्यवस्था केली पाहिजे. हे प्रकार बंद व्हावेत या हिशोबाने राष्ट्रवादी विचारांचे कुलगुरू (VC) नियुक्त होत आहेत, पण एक माणूस (तो उच्च पदावर असला तरीही) या परिस्थितीला पुरेसा ठरत नाहीये. कारण on paper हा प्रॉब्लेमच अस्तित्वात नाही.
हा प्रॉब्लेम आधी कागदोपत्री नजरेत आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाहीरपणे हिंदुफोबिक अनुभव share करणे, विद्यार्थी संघटनांनी व्यापक सर्वेक्षण करणे, व हिंदुफोबियाच्या मुद्द्याचा कॉलेजच्या accreditation criteria मध्ये समावेश करणे असा त्रिसूत्री कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. एकदा हा मुद्दा कॉलेजच्या मूल्यांकनावर प्रभाव पाडायला लागला, की ही समस्या on priority सोडवणं त्या संस्थेची जबाबदारी होईल कारण तसं न केल्यास कॉलेजची रेटिंग, ऍडमिशन, government funds, फिस, प्लेसमेंट, advertise या सगळ्यांचं गणित बिघडेल.
हे सगळं नेमकं कसं होईल, ते तिसऱ्या व अंतिम भागात पाहूया.
- प्रथमेश चौधरी
0 Comments