शैक्षणिक हिंदुफोबिया : उपाय


शैक्षणिक हिंदुफोबियाच्या मुद्द्यावर अनेक प्रोफेसर सुद्धा चिंतीत असतात, पण आपण काय करू शकतो या विचाराने ते गप्प बसतात. अशा अनेक प्रोफेसर व HoD कडून बरीच माहिती मिळवून मला सुचलेला हा कायमस्वरूपी उपाय सांगतो. सोप्या भाषेत समजण्यासाठी हे उदाहरण कामी येईल.


भारतात AICTE ही संस्था कॉलेजचं मूल्यांकन करते. तिच्या अधिकारात इंजिनिअरिंग, फार्मसी, MCA वगैरे कोर्सेस व त्यांचे कॉलेज येतात. ही संस्था कॉलेज व प्रोफेसरांसाठी नियमावली बनवते जसं की, प्रोफेसर या पदावर जॉइनिंग, प्रमोशन होण्यासाठी, काही नियम व अटी असतात. उदा. 10 वर्षांचा रिसर्च experience हवा, PhD केलेली हवी वगैरे वगैरे.


AICTE सारख्या संस्था इतर कोर्स साठी सुद्धा असतात. ह्या मूल्यांकन करणाऱ्या संस्थांना किती प्रचंड महत्त्व आहे ते बहुतांश कॉलेज स्टुडंट जाणून असतात. कारण जेव्हा "ती" टीम येते तेव्हा पूर्ण कॉलेज ideal दिसेल याची विशेष काळजी घेताना प्रोफेसर लोक दिसत असतात. जितकं चांगलं मूल्यांकन होईल, जितक्या चांगल्या प्रोफेसर लोकांच्या रिसर्च प्रोफाइल असतील, तितके जास्त रिसर्च फंड कॉलेज व प्रोफेसर ला मिळतात. चांगलं ग्रेड कॉलेजला मिळालं, की तिथल्या प्लेसमेंट सेल ची value वाढते. जास्त कंपन्या प्लेसमेंट साठी येतात, जास्त प्लेसमेंट झाली की entrance test चा त्या कॉलेजसाठी cutoff वाढतो, मग कॉलेजची फी वाढते, विद्यार्थी संख्या वाढते, डोनेशन कोटा मधल्या सीट ची किंमत वाढते, वगैरे वगैरे..


(पण इथे ही गोष्ट लक्षात घेणासारखी आहे, की विद्यार्थ्यांसोबतची वागणूक हा criteria मूल्यांकनात नाही! तो जर असता, तर धार्मिक द्वेष करणारे मुजोर प्रोफेसर प्रमोशन, funding, आणि जॉब साठीच अपात्र ठरले असते. पण आज मात्र चित्र अगदी उलट आहे.)


या सगळ्याचा हिंदुफोबियाच्या समस्येसाठी काय उपयोग आहे बघा:

सध्या ज्या घटना देशभर घडत आहेत, त्या एकेक "individual" news म्हणून गृहीत धरल्या जातात. कायद्याच्या भाषेत त्यांना एक घटना म्हणून पाहिलं जातं. पज वास्तव असं नाही. जवळपास प्रत्येक कॉलेजमध्ये अशा घटना घडत असून त्या awareness नसल्याने इग्नोर होत आहेत. हे सत्य सर्वेक्षणातून मांडावं लागेल. विशेषतः जे विद्यार्थी मीडिया चं शिक्षण घेत आहेत, त्यांना curriculum मध्ये survey चा प्रोजेक्ट करावा लागतो. मग एका शहराचा असा सर्व्हे आपण करू शकतो का? याचा विचार करा. Sample दखल एका शहरात जरी significant शैक्षणिक हिंदुफोबिया आपण सर्वेक्षणातून मांडू शकलो, तर हा विषय सरकारी पातळीवर हातात घेण्याची सबळ मागणी करता येऊ शकते. 

त्यासाठी प्रत्येक हिंदू विद्यार्थ्याला नाव उघड न करता आपला हिंदुफोबिक अनुभव व्यक्त करावा लागेल. जेव्हा अशी प्रकरणं मोठ्या संख्येने घडत आहेत हे पुराव्यानिशी दाखवू, तेव्हा हा भाग वर सांगितलेल्या मूल्यांकनाचा criteria म्हणून set करा, ही मागणी शासनदरबारी करता येते.


इंग्लंड मध्ये शाळांसाठी झालेल्या अशाच सर्व्हेनुसार तब्बल 51% हिंदू पालकांनी आपल्या लेकरांना हिंदू असल्याने चिडवल्याची, काफिर म्हणल्या गेल्याची कबुली दिली. 


हे सगळं so called modern असलेल्या इंग्लंडमध्ये होतंय. भारतात हिंदू बहुसंख्य असतानाही हे होत आहे. पण नेमकं किती होतंय? यासाठी सर्वेक्षण फार महत्त्वाचं आहे. अन्यथा 100 घटना घडत राहतील, त्यातल्या 5 उजेडात येतील, इतर 95 ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास होत राहील. पण या घटना कोणत्या भावनेतून होत आहेत? किती प्रमाणात होत आहेत? कशा प्रकारे होत आहेत या प्रश्नांची उत्तरं सर्वेक्षणातून मिळतील आणि तरच effective, कायमस्वरूपी उपाय करता येईल. आपण तयार आहोत?


- प्रथमेश चौधरी


Post a Comment

0 Comments