सध्या Valentine Week सुरू आहे. ह्या मागे असलेला धर्मांतराचा इतिहास वगैरे सांगत बसणार नाही, इच्छुकांनी गुगल वर शोधावा.
पण प्रेम आणि वासना या दोघांमध्ये असलेला गॅप दिवसेंदिवस कमी होतोय असं जाणवतंय म्हणून हा लेखनप्रपंच. कदाचित हे विचार विशीतल्या तरुणाचे अनेकांना वाटणार नाहीत, पण माझा मोठा मित्रवर्ग या विचारांशी सहमत असल्याने हे विचार अल्पमतात आहेत असंही मी मान्य करू शकणार नाही.
शालेय वयापासून आपण Gen Z लोक (1995 ते 2010 मध्ये जन्म झालेले लोक) प्रेम या विषयाकडे पाहतोय. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांना ज्या जाणिवा कॉलेजमध्ये किंवा त्यानंतर प्राप्त झाल्या, त्या Gen Z ना पार 7वी- 8वी पासून कळतात. त्यात सध्या आलेलं वेबसिरीज, टिकटॉक style च्या रिल्स आणि पूर्वीपासूनच भरकटलेलं बॉलिवूड यांनी एक perception तयार केलं. जो जितका जंगलीपणा प्रेमाच्या नावाने करेल, तो तितका cool. पण हा cool पणा रिल्स सारखा काही ठराविक काळच टिकतो. मग बॉडी काउन्ट सारख्या concept गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झाल्या. दोन लोक committed असूनही cheat करणं normalise व्हायला लागलं. तशा आशयाचे गेहराइया सारखे चिटिंग वर आधारित चित्रपट लोकप्रिय व्हायला लागले. एका स्त्री चे अनेक पार्टनर असू शकतात, एका पुरुषाचे एकाच वेळी अनेक पार्टनर असू शकतात, हे सगळं हळूहळू normalise होतंय.
यात दोघांपैकी जो जास्त स्वप्नरंजक असतो त्याचा त्रास अधिक होतो. मग ब्रेकप, पॅचप च्या चक्रात करियर चे 12 वाजतात. शारीरिक रचनेनुसार विशिष्ट वयात विशिष्ट भावना प्रधान असतात हे आपण नाकारू शकत नाही. पण त्या भावनांमागे वाहवत जाऊन भावनिक, आर्थिक, मानसिक नुकसान करून घ्यायचं की नाही तेही ठरवणं गरजेचं नाही का?
कसल्याही सेलिब्रेशन, रिलेशनशिप वगैरे ला विरोध करून ते थांबेल असं वाटणं म्हणजे मूर्खपणा आहे. जगात सर्वजण प्रेम करतात, पुढेही करत राहतील. पण यात असलेली जंगलीपणाची भावना मात्र घातक आहे. कदाचित हा जंगलीपणा सुरुवातीला attract करू शकतो, मात्र त्याचं रूपांतर फ्रीजमध्ये सापडलेल्या मृतदेहात सुद्धा होऊ शकतं हे लक्षात घ्यायला हवं.
आपण ज्या कोणाच्या प्रेमात आहोत, तो व्यक्ती Legally तोच आहे ना जो तो दाखवतोय? याची खातरजमा न करता अनेक लोक लिव्ह इन पर्यंत पोहोचतात, यातून लव्ह जिहाद किंवा इतरही अनेक समस्या उद्भवतात. Love at first sight, प्यार अंधा होता है, everything is fair in love and war हे सगळे वेगवेगळ्या लेखकांचे प्रसंगानुरूप लिहिलेले डायलॉग आहेत. हे कोणतं तत्वज्ञान नाही ज्याच्या आधारावर आपण आयुष्याचे निर्णय घ्यावे. प्रेम करताना पाय जमिनीवर आणि डोकं जागेवर ठेवल्याने स्वतःचंच नुकसान टाळल्या जाऊ शकतं.
प्रेम करताना कोणी किती मर्यादा पाळाव्यात हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण वैयक्तिक आणि कायदेशीर विचार करून आपल्या पार्टनर ची atleast आयडेंटिटी तपासून घेणं आवश्यक आहे. त्याने किमान खोटी ओळख दाखवून घडणाऱ्या लव्ह जिहादला आळा घातला जाईल आणि जोपर्यंत हे व्हेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत फक्त शारीरिक नव्हे तर भावनिक मर्यादाही पाळायला हव्याच.
अधिक काय लिहिणे...
- प्रथम उवाच
0 Comments