भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा सर्वात मोठा आधार स्तंभ हा कोणत्या पुस्तकात, व्यवस्थेत किंवा व्यवसायात नसून तो इथल्या सहिष्णू हिंदूंच्या बहुसंख्येत आहे. भारत हा जगातील सर्वात सेक्युलर देश आहे, कारण इथे बहुसंख्य लोक आणि अल्पसंख्याक लोक समान नसून अल्पसंख्याक लोकांना गरजेपेक्षा जास्त अधिकार देण्यात आलेले असून बहुसंख्य मात्र रोज तुडवले जातात.
ही परिस्थिती असतानाही इथला मूलनिवासी हिंदू रस्त्यावर उतरत नाही, कारण तो मुळातच सहिष्णू आहे. त्याला फक्त निवांतपणे जगायचं आहे, मग त्याचे अधिकार कमी असले, त्याच्या धर्मबांधवांवर अत्याचार झाला, किंवा त्याच्या श्रद्धेचा अपमान झाला, त्याच्या धर्माची डेंगू मलेरिया सारख्या आजारासोबत तुलना झाली, तरी भारतातला सामान्य हिंदू आठवड्याभरात पुन्हा नॉर्मल होऊन जातो. एवढा पराकोटीचा सहिष्णू समाज बहुसंख्येने आहे, म्हणूनच भारतात सेक्युलर व्यवस्था टिकून आहे.
पण जगातले विस्तारवादी धर्म या परिस्थितीतही संतुष्ट नसून कोण जास्तीत जास्त धर्मांतर घडवून आणेल यासाठी त्यांची स्पर्धा सुरू असते. भारतामध्ये इस्लामचं आगमन शस्त्राच्या धाकाने, अन्याय अत्याचाराने झालं आहे. इस्लामी धर्मांतर प्रक्रिया जेवढी उघड उघड चालते, तेवढा त्याचा प्रतिकारही अल्प प्रमाणात का असेना, पण चालतो.
पण एका मोठ्या सायलेंट conversion ची लाट हिंदू समाजाला पोखरून काढत आहे, आणि याकडे आपण सपशेल दुर्लक्ष करत आहोत. ती लाट म्हणजे हिडन ख्रिश्चन किंवा crypto ख्रिश्चन. कॉन्व्हेंट शाळा, ख्रिस्ती सेवाभावी संस्था, इवांगलिस्ट चर्च, ख्रिस्ती NGO या माध्यमातून भारताच्या अनेक राज्यात conversion रॅकेट चालतात. आणि हे धर्मांतर एका systematic प्रोसेस चा भाग आहे.
वर्ल्ड ख्रिश्चन डेटाबेस नावाची संस्था जगभरात ख्रिश्चनांच्या संख्येवर, आर्थिक सामाजिक स्थितीवर आणि धर्मांतराच्या प्रमाणावर नजर ठेवून असते. यांच्या रिपोर्ट नुसार भारतात आजच्या घडीला सुमारे अडीच कोटी क्रिप्टो ख्रिश्चन आहेत.
हे क्रिप्टो ख्रिश्चन ऑफिशियली ख्रिश्चन नसतात, म्हणजे कागदोपत्री ते मुस्लिम असतील, हिंदू असतील पण मुळात त्यांची धर्मांतर प्रक्रिया पूर्ण झालेली असते. रेडिट सारख्या सोशल मीडियावर त्यांच्या हिडन community असतात. घरच्यांपासून, मित्रांपासून लपून हे क्रिप्टो ख्रिश्चन आपले दैनिक ख्रिश्चन विधी करत असतात. पालकांना सांगायची हिंमत नसणारे विद्यार्थी, आरक्षण व शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले लोक (धर्मांतर केल्यावर आरक्षण नाहीसे होते), कुटुंबातून बाहेर काढले जाण्याची भीती असलेले लोक प्रामुख्याने क्रिप्टो ख्रिश्चन होतात. मात्र एक दिवस त्यांचं पूर्ण कुटूंब ख्रिस्ताच्या प्रभावाखाली येऊन उघडपणे त्यांना ख्रिश्चन होता येईल असा त्यांचा श्रद्धात्मक विश्वास असतो.
धार्मिक बहुसंख्या ही एकमेव जमेची बाजू सध्या भारतीय हिंदू समाजाकडे असताना असे सिक्रेट ख्रिश्चन सव्वा दोन कोटी एवढ्या मोठ्या संख्येत असणं ही धोक्याची घंटा आहे. या धोक्यापासून वाचण्यासाठी हिंदूंच्या सर्व पंथांना स्वतःमध्ये काही आमूलाग्र बदल घडवावेच लागतील. Hindu Evangalism ची निर्मिती करावी लागेल. आर्य समाजाने ज्या गोष्टी शंभर वर्षांपूर्वी केल्या त्यापासून अनेक चांगल्या गोष्टी शैव, शाक्त, वैष्णव, नाथ, दत्त, भागवत सगळ्याच संप्रदायांना शिकाव्या लागतील. सध्या तरी एवढंच लिहिता येईल🙏
0 Comments