कामरासाठी लोकशाही आणि...


कुणाल कामरा नावाच्या व्यक्तीवर सहसा स्टँडप कॉमेडियन असल्याचा दावा करण्यात येतो. कामरा स्वतःला सुद्धा स्टँडप कॉमेडियन म्हणत असतो. राजकीय व्यंग करणे हा प्रकार लोकशाहीसाठी फार सकारात्मक आहे. लोकांना हसवणाऱ्या कलाकारांनी हसत हसत राजकीय पिन टोचवली की लोकांपर्यंत लगेच विषय पोहोचतो. आर के लक्ष्मण पासून पु लं देशपांडे पर्यंत अनेकांनी आपापली कला मग ते व्यंगचित्र असो किंवा स्टँडप कॉमेडी. स्वतः बाळासाहेब ठाकरे सुद्धा व्यंगचित्रकारच होते. 

आणि लोकशाही मध्ये कॉमेडियन लोकांनी सरकारवर टीका केलीच पाहिजे. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा होती की मी कामराच्या कलेच्या नावाने त्याच्या freedom of expression चं रक्षण करावं, पण त्याचा परिणाम काय होईल?

सर्व creators, पत्रकारांनी, आणि कलाकारांनी एकमेकांना सहकार्य करून लोकशाही मजबूत ठेवली पाहिजे. पण जेव्हा अर्णब गोस्वामी ला अटक झाली, कंगना च्या घरावर बुलडोझर चालला, ममता बॅनर्जी वर टीका केली म्हणून व्यंगचित्रकार 11 महिने जेल मध्ये राहिला. समाजवादी पार्टीचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून पत्रकार जेल मध्ये गेला. पवार साहेबांविरोधात नाव न घेता फक्त लाक्षणिक ट्विट केल्याने केतकी चितळे ला बलात्काराच्या धमक्या आला, जेल मध्ये जावं लागलं. अजित भारती या हिंदी पत्रकाराने कॉंग्रेसच्याच नेत्याचं वाक्य quote केलं, पण ते आवडलं नाही म्हणून त्याला पकडण्यासाठी तामिळनाडू मधून पोलीस आले. 

या सर्व प्रकरणात कोर्टाने सरकारला झापलं आहे, पण तेव्हा कोणत्याही कॉमेडियन, युट्युबर, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला नाही! ह्या सत्तेच्या दुरुपयोगाच्या वेळी कामरा सारखे लोक आणि त्याचे वरून न्यूट्रल दिसणारे पण हळूच डावे विचार पसरवणारे  मित्र गप्प बसतात. 

याचा परिणाम असा होतो, की हिंदूंवर आणि हिंदूंची बाजू मांडणाऱ्या राजकीय पक्षांवर टीका झाली की पूर्ण लॉबी हातात संविधान घेते, फ्रीडम-फ्रीडम करते आणि स्वतःची सत्ता आल्यावर सगळ्यात आधी तेच फ्रीडम चुलीत घातल्या जाते. हे लोकशाही साठी धोकादायक आहे. आता जर freedom of thought संरक्षक लोकांनी कामराची बाजू घेतली तर संदेश असा जाईल, की dmk, tmc, सपा सारख्या पक्षांवर टीका केली तर कोणीही पाठीशी उभं राहत नाही, पण हिंदुत्वाच्या विचारांवर चालणाऱ्या नेत्यांना टार्गेट केलं, की डावे उजवे सेक्युलर सगळेच पाठीशी उभे राहतात. त्यामुळे जाणीवपूर्वक आता डोळेझाक करावीच लागेल. कामरासाठी लोकशाही आणि इतरांसाठी ठोकशाही हे बंद झालं पाहिजे. जेव्हा कामराचे राजकीय समर्थक त्यांच्या विरोधी विचारांना स्थान देतील, आणि सत्तेचा दुरुपयोग करून अजित भारती सारख्या पत्रकारांना त्रास देणं बंद होईल, तेव्हा आनंदाने आणि कर्तव्य भावना, लोकशाही ची स्पिरिट वगैरे सगळं पाळून कामराच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. तोपर्यंत कम्युनिस्ट विचारांचे महान कवी रामधारी दिनकर यांच्या ओळी लक्षात ठेवा

वृथा है पूछना था दोष किसका,

खुला पहले गरल का कोष किसका

जहर अब तो सभी का घुल रहा है

हलाहल से हलाहल धुल रहा है


✍️ प्रथम उवाच

Join whatsapp channel : https://whatsapp.com/channel/0029Vb2pFrO96H4PWJsW4u3m

Post a Comment

0 Comments