जेव्हा आपण इतिहासात किंवा भूतकाळात डोकावतो, तेव्हा अनेक चांगले- वाईट अनुभव आपल्याला कळतात. कित्येक वेळा आजच्या राजकीय परिस्थितीला आणि विचारांना ते प्रतिकूल असतात तर काही वेळा अनुकूलही असतात.
पण जेव्हा मुस्लिम आक्रमकांचा इतिहास लिहायची, बोलायची वेळ येते तेव्हा तो मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार केला जातो. औरंगजेब, अफजल खान यांना वाईट बोलणं म्हणजे आजच्या मुस्लिमांना टार्गेट करतोय असा गैरसमज पसरवला जातो.
या अपप्रचारात काहीच तथ्य नाही. अफजल खान मुस्लिम असल्याने त्याने पाडलेली मंदिरं, स्वतःच्याच 65 बायकांची केलेली क्रूर हत्या चांगली ठरते का? किंवा औरंगजेब मुस्लिम होता
म्हणून स्वतःच्या वडिलांना कैद करणे, गैरमुस्लिम प्रजेवर धर्माच्या आधारावर tax लावणे, जबरदस्ती धर्मांतर करणे, आणि अभिमानाने मंदिर पाडल्याच्या सरकारी नोंदी करणे ह्या गोष्टी चांगल्या म्हणायच्या का? अजिबात नाही.
कित्येक लोकांचा हा आक्षेप असतो कि त्यांची मुस्लिम identity highlight का करता? तर ती identity त्यांनी स्वतःच अधोरेखित केली आहे. वर सांगितलेली अमानवी कृत्य ह्या राक्षसांनी अभिमानाने केली आहेतच, वरून इस्लामच्या आदेशाने केली आहेत हा त्यांचा स्वत:चा दावा आहे.
पण त्यांचा आजच्या मुस्लिमांशी संबंध जोडण्याचा प्रश्नच येत नाही. हे जे काही घडलं ते त्या क्रूर आक्रमानाकंनी केलं. आजचे मुस्लिम बांधव त्या आक्रमकांचे कोण आहेत? जर कोणी असलेच तर ते गुलामांचे वंशज आहेत. कारण हे मुघल आणि इतर सुलतान convert झालेल्या भारतीय मुस्लिमांना सुद्धा तुच्छ समजत असत. त्यांना मोठी सरदारकी देणे टाळत असत. दौदी बोहरा या कुराण आणि अल्लाहवर श्रद्धा ठेवणाऱ्या समाजाच्या धर्मगुरूंची पण औरंग्याने हत्या केली होती. तरीही आजचे मुस्लिम औरंगजेबाला आपला hero मानत असतील तर ते निव्वळ अज्ञान आणि हिंदुद्वेष आहे.
सर्वच जाती धर्मामध्ये वाईट प्रवृत्तीचे काही लोक असतात. स्वराज्याशी द्रोह करणारा अण्णाजी दत्तो किंवा तुकाराम गाथा बुडवण्याचा आदेश देणारे धर्माधीश हे ब्राह्मण होते. अफजलखानाच्या सैन्यात असणारे शिवरायांचे रक्ताचे नातेवाईक मंबाजी भोसले, तसेच संभाजी राजांना पकडवून देणारे गणोजी शिर्के हे मराठा होते. पण कधी ब्राह्मण महासभेत तुम्ही अनाजी पंताचा फोटो किंवा मराठा मूक मोर्चामध्ये गणोजी शिर्क्याचा फोटो पाहिला आहे का?
मग 'बाप तो बाप ही होता है' म्हणत औरंग्याचा जयजयकार करणारे समाजविघातक लोक मुस्लिम समाजात कसे काय तयार होत आहेत? कारण सेकुलर नेत्यांच्या प्रभावाने जसाच्या तसा इतिहास पचवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक टाळण्यात आला.
ज्या मुस्लिमांनी खरा इतिहास वाचला, त्यांना आपल्या पूर्वजांच्या कृत्याचं वाईट वाटलं आणि शतकानुशतके अत्याचार भोगूनही मुस्लिमांना आपलं मानणाऱ्या हिंदूचा अभिमान वाटला. ASI मध्ये असलेले के.के. मुहम्मद प्रांजळपणे ह्या सर्व अत्याचारांची कबुली देतात आणि प्रायश्चित्ताच्या भावनेने भग्न झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यासाठी मेहनत घेतात. ही गोष्ट कौतुकास्पद नाही काय? पण हे के. के. मुहम्मद किंवा महाभारत वाचणारे, गंगा स्नान करणारे अब्दुल कलाम सर हे अगदीच बोटावर मोजण्यासारखे निघतात, कारण mass level वर अजूनही सेकुलर मुलामा दिलेला खोटा इतिहास शिकवला जातो. धार्मिक इतिहासाचा नावाखाली औरंगजेबाचे गुणगान केले जाते. ही गोष्ट बंद झाल्याशिवाय धार्मिक संघर्ष कधीच बंद होणार नाही, आणि भविष्यात अजून समस्या वाढतच जातील हे मात्र नक्की.
- प्रथमेश चौधरी
0 Comments