भारतीय जीवनपद्धतीने मानवाचे गुण आणि कर्मानुसार 4 भागांत वर्गीकरण केले. त्यात सर्वोच्च प्राधान्य ज्ञानवान समजल्या जाणाऱ्या व इतरांना ज्ञानदान करणाऱ्या समूहाला देण्यात आले. भारतीय समाज हा सिंधु-सरस्वती संस्कृतिच्या उगमापासूनच ज्ञानाधिष्ठित असावा, त्यामुळेच इथे विद्वानांची कायम पूजा झाली.
ज्या समाजात शिक्षक सर्वोच्च स्थानी असतो, त्या समाजाच्या विचारांमध्ये स्पष्टता असते. असा समाज सहजासहजी गुलाम बनवणे किंवा धर्मांतरित करणे अशक्यप्राय असते.
मध्ययुगीन काळात इस्लामी वर्चस्ववादाच्या स्पर्धेमध्ये एकेक राष्ट्र व संस्कृती शरणागत होऊन इस्लाम मध्ये धर्मांतरित होत होती.
यहुदींना मातृभूमी सोडून भारतात शरण घ्यावी लागली. पारशी समाज त्यांचा देश पारस सोडून पळाला आणि पारस चा पर्शिया झाला. अग्निपूजक झोराष्ट्रीयन समाज सुद्धा इस्लामने गिळला व त्याचा इराण झाला. असे एकेक राष्ट्र इस्लामच्या तलवारीपुढे नतमस्तक होत असताना भारत मात्र तब्बल एक हजार वर्षे आक्रमण सहन करून अजूनही तीच पवित्र हिंदवी संस्कृती जपून दिमाखात का उभा आहे? याचं उत्तर इथल्या शिक्षणप्रधान संस्कृतीत आहे. पण इथून पुढेही भारत तसाच असेल का?
शंका आहे.
प्रतिकात्मक काश्मिर नरसंहार, भाल्यावर शीर नेणारे सैनिक, पालघर साधू हत्याकांड |
इतिहासात जेव्हा जेव्हा आक्रमणे झाली, तेव्हा सर्वप्रथम समाजाचा थिंक टॅंक असलेल्या ह्या बुद्धिजीवी वर्गावर आघात झाले. पंडितांच्या कापलेल्या मुंडक्यांचे मनोरे या भारतभूमीवर रचले गेले. पण सुदैवाने समाजाची चेतना जिवंत होती. समाजाने आत्मपरीक्षण करून चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. "शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्र चर्चा प्रवर्तते" (ज्या राष्ट्राचे शस्त्राने रक्षण होते, तिथेच शास्त्रीय चर्चा शक्य असते) हे प्रॅक्टिकल विचार तेव्हा आपण स्वीकारले. बुद्धिजीवी वर्गाने स्वतःची शैक्षणिक शक्ती वापरल्याने समाज जागला, लढण्यास सिद्ध झाला आणि त्यातून बलाढ्य योद्धे निर्माण झाले.
चाणक्याच्या शिकवणीत वाढलेले सम्राट चंद्रगुप्त, विद्यारण्य ऋषींनी घरवापसी केलेले विजयनगरचे निर्माते हरिहर-बुक्काराय, एकलिंगेश्वराच्या भक्तीने भारावलेले महाराणा प्रताप, श्रींची इच्छा मानून स्वातंत्र्य मिळवून देणारे शककर्ते शिवराय अशी पूर्ण संघर्ष करणाऱ्या सुपुत्रांची मालिका ह्या भारतमातेने जन्मास घातली. हे सर्व योद्धे केवळ हिंसा आवडते म्हणून युद्धाला निघाले नव्हते, तर त्यांच्या विविध शिक्षकांनी दाखवलेली धर्मस्थापनेची व राष्ट्ररक्षणाची दिशा पकडून त्यांनी हातात शस्त्र घेतले होते.
चाणक्य, शिवछत्रपती, विद्यारण्य-हरिहर-बुक्काराय, संत तुकाराम, समर्थ रामदास, महाराणा प्रताप, पेशवा बाजीराव |
वेळ पडेल तेव्हा शस्त्रसज्ज असणे हा हिंदूंचा धर्म आहे हे त्यांनी अचूक हेरले होते. परंतु कालांतराने इंग्रजरूपी असुरांची सत्ता जेव्हा भारतावर आली, तेव्हा मात्र समाजाची चेतना हळूहळू नष्ट होत गेली. विद्वानांची पूजा करणारा समाज इतका भिकेला लागला, की समाजाने श्रीमंतांची पूजा सुरू केली. ज्यांच्याकडे पाहून आदर्श घ्यावा ते सुद्धा भ्रष्ट व्हायला लागले, संपत्ती साठी आपल्याच देशबांधवांना लथाडून मारायला तयार झाले.
तेव्हा इंग्रजांनी दुसरा डाव खेळून पंडित/बुद्धिजीवी वर्गाला वेगळे पाडून अखंड हिंदू समाज विभाजित करायला सुरुवात केली (ही प्रक्रिया अजूनही बंद झालेली नाही)
समाजाला दिशा दाखवणारेच दिशाहीन व शस्त्रहीन झाले. स्वतःच्या ज्ञानाचा व बुद्धीचा प्रसार करायचा सोडून लाल कपड्यात गुंडाळून ठेवायला लागले. क्षत्रियांचा भूतकालीन पराक्रम त्यांना स्वतःची achievement वाटायला लागला. एकमेकांना पूरक असण्यात जी महानता होती, तिची जागा जातीय स्पर्धेने घेतली. परिणामी क्षत्रियांचे सामर्थ्य ह्या बुद्धिजीवी पंडितांपासून दुरावले.
ह्यात नुकसान समाजाचे व पर्यायाने देशाचे झाले. क्षत्रियांना बुद्धिजीवी वर्गाचा पाठिंबा न मिळून समाजात त्यांना डाकू/चोर/दरोडेखोर म्हणल्या गेले. उदा.
1. 1857 चा उठाव हा त्याकाळात सर्व मीडिया मध्ये गद्दारी, दगाबाजी, विद्रोह या नावांनी ओळखला गेला व उठाव करणाऱ्या मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी, बहादूर शाह जफर, नानासाहेब पेशवे ह्या मंडळींना इतर राजांची मदत मिळाली नाही. कोल्हापूर, सातारा, जयपूर, उदयपूर इत्यादी राजे राजवाड्यांनी जर तेव्हा ह्या स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली असती, तर इंग्रज तेव्हाच हाकलले गेले असते. पण बुद्धिजीवी वर्गाकडून मिळणारा पोलिटिकल करेक्टनेस तेव्हा गायब होता; म्हणून क्षत्रियांची शक्ती दोन दिशांना विभाजित झाली. वीर सावरकरांनी हे विघातक narrative बदललं, आणि 1857 च्या उठवाला पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणणे सुरू झाले.
2. वासुदेव बळवंत फडके, वस्ताद लहुजी साळवे हे महान मराठी क्रांतिकारक मराठी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले, पण त्यांची प्रसिद्धी दहशतवादी/ दरोडेखोर म्हणून करण्यात आली. टिळकांचा केसरी वगळता कोणत्याच वृत्तपत्राने त्यांच्या बद्दल सकारात्मक छापले नाही. पुन्हा एकदा बुद्धिजीवी वर्गाने शस्त्रसज्ज क्षत्रियांना पूर्ण पाठिंबा न दिल्याने देशाचे नुकसान झाले.
वासुदेव बळवंत फडके, वस्ताद लहूजी साळवे |
हे 2-3 प्रसंग वगळता पंडितांना शस्त्रसज्जता सोडल्याचे काही परिणाम भोगावे लागले नाहीत. पण भारत स्वतंत्र झाल्यावर मात्र डोळ्यात अंजन घालणारी घटना घडली. केवळ अंगावरचे कपडे घेऊन काश्मिरी पंडितांना स्वतःच्या घरातून पळ काढावा लागला. कारण दगडफेकीला गोळ्यांनी आणि गोळ्यांना बॉम्बने प्रत्युत्तर देणारा शस्त्रधारी कोणीच नव्हता!
स्वतःचे व स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी उपाय करण्याचा कॉमन सेन्स पंडितांनी 200 वर्षांपूर्वीच सोडला होता.
आजही अतिरेकी अहिंसेच्या मार्गावर वेडा झालेला हिंदू हा बलात्कारी लोकांच्या एन्काऊंटर वर चूक की बरोबर ह्या विचारात पडतो. औरंगजेब महान तर नव्हता ना? असे प्रश्न त्याला पडतात. पण "सर तन से जुदा" म्हणून कॅमेऱ्यासमोर धमक्या देणं हा त्याला त्या समाजाचा संवैधानिक अधिकार वाटतो.
भारतात शूरवीरांची कमतरता कधीच नव्हती व यापुढेही नसेल पण आता मात्र समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या बुद्धिजीवी वर्गाची खरी कसोटी आहे. शास्त्र आणि शस्त्र ह्या दोन्ही विद्यांचा अंगीकार करणारे परशुराम आजच्या पंडितांना स्वीकारावे लागतील व न्यायप्रद हिंसेच्या परिणामाला नैतिक समर्थन करावे लागेल. अन्यथा लष्करी जवानांच्या हौतात्म्यावर जल्लोष करणारे देशविरोधी घटक, अतिक अहमद सारख्या माफियांच्या हत्येनंतर candle march काढत राहतील आणि काश्मिरात जे संकट हिंदूंवर आले, ते उद्या तुमच्या माझ्या घरात येईल.
- प्रथमेश चौधरी
0 Comments