तुकोबारायांचं Ecosystem


"ए आजी! हे कसलं तुकाराम बिजोत्सव वगैरे करत बसलीस ग, चल बर माझ्यासोबत बागेत." 10 वर्षांचा राजू त्याच्या आजीला म्हणाला. 

राजू एका मध्यमवर्गीय आजीचा नातू आणि नव्याने मॉडर्न(?) झालेल्या जोडप्याचा मुलगा होता. आई बाबा पठाण चित्रपट पहाण्यासाठी गेले होते, हा बिचारा घरी एकटा बसून बोर होत होता. त्याला आजीसोबत बाहेर बागेत जायचं होतं. आजी त्याला तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाची माहिती सांगत होती पण तो तिला मध्येच थांबवत म्हणाला,

"माझे कोणीच फ्रेंड्स ह्या तुकाराम वगैरेला ओळखत नाहीत.  मला बागेत सोड, मी खेळतो आणि रात्री कर तुझं ते गाथा वाचन and all..."

आजीच्या लक्षात आलं, ह्या नवीन पिढीला धर्मनिष्ठ बनवण्यासाठी जुने पुराणे प्रकार जसे च्या तसे वापरता येणार नाहीत. पण आजी काही हार मानणारी नव्हती. "अभ्यासे सेवनी विष पडे" (प्रयत्न केल्यावर माणूस विष सुद्धा पचवू शकतो) असे सांगणाऱ्या तुकोबांच्या भक्ताला पराभवाची सवय तरी कशी असणार. आजीने जराशी ट्विस्ट आणून पुन्हा try केलं.

" राजू तुला आणि तुझ्या तुझ्या फ्रेंड्स ला कोणतं कार्टून आवडतं रे?"

राजू धडाधडा marvel च्या अवेंजर्स ची माहिती सांगू लागला...

आजी, त्या अवेंजर्स मध्ये न खूप सारे सुपर हिरो एकत्र येतात आणि जगाला एलियन पासून वाचवतात. खरंच असेल का ग असं? एलियन कधी येतील का आपल्याकडे?

हो. आधीही आले होते एलियन. आणि ह्या तुकाराम महाराजांच्या ज्या स्टोरी मी सांगते न, त्या स्टोरी ऐकून खूप सारे अवेंजर्स तयार झाले. तुकाराम महाराज हे एका खूप मोठ्या ऑर्गनायझेशन चे ऑफिसर होते आणि त्यांच्या आधी आणि नंतर खूप लोकांनी एलियन हाकलून लावले आणि ठार मारले आपल्या देशातून! तुम्हाला इतिहासात शिवाजी महाराजांबद्दल माहिती असेल न, ते पण तुकोबांच्या ग्रुप मध्येच होते!

राजू गोंधळून बोलला... "इ ती हा स? You mean history?  याक....

तसा अजून syllabus बाकीच आहे, पण आम्ही तर फक्त पाठ केलं आहे fill in the blanks मध्ये, Raja Shivaji was a maratha King born in 1630. राजूने पाठ केलेली रिकामी जागा ऐकवली. 

आता मात्र आजीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला मनोमन वाटलं, आपण नातवाच्या इंग्लिश बोलण्यानं इतकं हरवलो, की तो स्वतःच्या मातृभूमीकडे एलियन म्हणून पाहतोय याकडे आपलं लक्षच गेलं नाही.

पण हार मानायची नाही हे मनाशी पक्कं ठरवून तिने तिची स्टोरी सुरू ठेवली. 

" अरे हसतोस काय वेड्या सारखं. तुझी आजी कधी खोटं बोलली आहे का? चल बरं बागेत. मी माझी स्टोरी चालताना सांगते. असं म्हणून तिने सांगायला सुरु केलं.

एलियन म्हणजे नेमकं काय असतं? असं काहीतरी जे आपल्याकडचं, किंवा आपल्या ओळखीचं नाही. पण असे तर हजारो लोक येत असतात, तर त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. पण काही एलियन असेही असतात जे आपल्याकडे येऊन आपल्यालाच त्रास देऊ पाहतात. तसेच काही एलियन आपल्या देशात आले. ग्रीक, हूण, कुशाण, इंग्रज, डच, पोर्तुगीज, अफगाण, तुर्की, उझबेक आणि खूप सारे..

राजू : एवढी मोठी list?

आजी : हो मग! आपला देश होताच तेवढा ब्युटीफुल! पण एवढ्या सगळ्या अटॅक्स च्या list नंतर सुद्धा आपण अजूनही का टिकलो माहितीये? कारण आपल्याकडे सुपर हिरो अवेंजर्स ची फॅक्टरी आहे, तिला संत परंपरा म्हणतात. 

ह्या संतांबद्दल नंतर सांगते, पण आज ज्यांचा बीजोत्सव आहे न, त्या तुकाराम महारांजांबद्दल सांगते. तेवढ्यात राजुचे फ्रेंड्स पण येऊन स्टोरी ऐकायला बसले. आजी ने continue केलं:

तर मी जी सुपर हिरो ची फॅक्टरी म्हणत होते न, त्या संत परंपरेतले महत्त्वाचे संत म्हणजे तुकाराम महाराज. त्यांनी गावोगावी जाऊन open माइक आणि स्टँड अप सेशन घेतले. तेव्हा त्याला कीर्तन म्हणायचे लोक. आणि लोकांना सांगितलं की तुम्हाला प्रॉब्लेम आले, तर पळून जाऊ नका, तुमच्या कडे ताकद आहे, fight करा आणि एलियन ला हुसकावून लावा. 

राजू : कोणते एलियन होते?

आजी : विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वऱ्हाडची इमाद शाही, बिदर ची बरीदशाही आणि निजामशाही. आणि सगळ्यांत डेंजर म्हणजे दिल्लीचे मुघल. 

राजु : आजी पुन्हा list आणलीस यार 

आजी : अरे, म्हणजे खूप सारे होते एवढं लक्षात ठेवा. 

तुकारामांसारखे अजून एक avenger होते, रामदास नावाचे. त्यांनी गावोगावी हनुमान मंदिर आणि व्यायामशाळा बांधुन ठेवल्या होत्या. तिथले पैलवान सुद्धा कीर्तनाला जायचे. तिथे त्यांना कळायचं की मिळवलेली शक्ती नेमकी कुठे वापरायची. 

असं करत करत तुकोबांनी एक eco system तयार केली. कोणी शरीराने दणकट होता तर कोणी मस्त बोलायचा, कोणाच्या writing skills चांगल्या होत्या तर कोणी छान गाणी गायचा. 

पण प्रत्येक जण एकाच ध्येयासाठी झटला. एकाच टार्गेट साठी लढला. खूप त्रास सहन केले, स्वतः तुकाराम महाराजांना आणि सगळ्याच संतांना आपल्याच जवळच्या लोकांनी त्रास दिला, पण त्यांच्यातील कोणीच target complete केल्याशिवाय थांबला नाही. 

मुले : पण ते टार्गेट होतं काय?

आजी : वैष्णवांचा भगवा झेंडा सर्वत्र पसरवणे!

ज्याच्या writing skills मस्त होत्या, त्यांनी लेखणीतून भगवा फडकवला,

जो छान गाणी गायचा, त्याने अभंग गाऊन, कीर्तन करून भगवा फडकवला 

जो शरीराने बलदंड होता, त्याने शिवरायांची सेना join केली 

आणि शेवटी target complete केलंच!

मुले : Wow! पण ज्यांना छान बोलता यायचं ते

राजू : ती माझी आजी! जिने तुकाराम वाचले, ऐकले, गायले आणि आपल्याला सांगितले😊

आजची पिढी हाताबाहेर गेली; म्हणून complain करणारे खूप आहेत, पण कधी सुपरहिरो म्हणून त्यांना स्वधर्म शिकवणारी आजी व्हायचा प्रयत्न करा. 

ते गाथाही ऐकतील आणि दासबोधही वाचतील. विश्वास ठेवा, काल्पनिक कथांपेक्षा तुणतुणे आणि मृदंग घेऊन एलियन साफ करणारे अवेंजर्स त्यांना जास्त आवडतील.

- प्रथम उवाच


प्रथम उवाच इंस्टाग्राम (क्लीक करा)

प्रथम उवाच Youtube (क्लिक करा)

Post a Comment

0 Comments