काल अनेक सेलिब्रिटी लोकांनी केलेल्या All eyes on Rafah अशा प्रकारच्या स्टोरी,पोस्ट आणि ट्विट पाहून तुम्ही गोंधळात असाल तर ही पोस्ट तुमच्या साठी आहे.
सध्या सुरू असलेल्या इस्राएल विरुद्ध हमास या युद्धाशी त्याचा संबंध आहे. मुळात हे युद्ध इस्राएल(ज्यू) विरुद्ध पॅलेस्टाईन(मुस्लिम) या दोन देशांमध्ये सुरू आहे, पण पेलेस्टाईनला स्वतःची सेना नसल्याने त्यांच्यावतीने हमास हा जगन्मान्य दहशतवादी गट लढत आहे.
हमास ने निरपराध इस्रायली नागरिकांची कत्तल व अपहरण केल्यापासून हे युद्ध सुरू झालं असून इस्राएल ने काल केलेल्या हल्ल्यापर्यंत यात अनेक चकमकी घडल्या आहेत.
काल इस्राएल सैन्याकडून झालेल्या Rafah या शहरावरच्या हल्ल्यात 40 हुन अधिक निरपराध लोक ठार झाले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका असा संदेश देण्यासाठी जगभरात All eyes on Rafah हे अभियान सुरू झालंय.
या सगळ्या भांडणाचे कारण आहे जेरुसलेम मधील एक मशीद जीचं नाव अल अक्सा आहे. ख्रिस्ती, मुस्लिम आणि ज्यू अशा तिन्ही धर्मांसाठी ते ठिकाण पवित्र आहे. इस्लामच्या निर्मिती पूर्वी त्या प्रदेशात ज्यू राहत असत, नंतर मुस्लिमांनी हा प्रदेश जिंकून घेतला व पुढे जे अपेक्षित होतं ते घडलं.
1948 ला इस्राएल ची स्थापना झाल्यानंतर इस्राएल व पलेस्टिन मध्ये अनेक युद्धे झाली आहेत, व सगळ्यात इस्राएल जिंकला आहे. त्यामुळे आता जेरुसलेम व बहुतांश प्रदेश इस्राएल च्या ताब्यात आहे.
आता या सगळ्या गोष्टींचा खरं म्हणजे आपल्याशी काहीच संबंध नाही. भारतीय व इतर देशातील मुस्लिमांना असं वाटतं की आधी अल अक्सा ही पवित्र मशीद त्यांच्याकडे होती म्हणून त्यांना ती परत मिळावी. मग हाच न्याय काशी मथुरा व अयोध्येला लावून लवकरच ते ताबा सोडतील असं अपेक्षित नव्हतं काय? पण हा निरागस प्रश्न मुस्लिम समुदायाला विचारण्याची इच्छाशक्ती कोणत्याच सेक्युलराकडे किंवा हिंदुत्ववादी सत्ताधाऱ्याकडे नाही.
अनेक बॉलिवूडकर नट तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही राममंदिरप्रश्नावर गप्प बसले. मग पलेस्टिन प्रश्नावर यांची जीभ का वळवळते, हा खरा प्रश्न आहे. 40 निरपराध मारले गेले, तेही युद्ध सुरू असताना, तर पूर्ण जगाचे डोळे Rafah वर खिळले आहेत. मग किमान भारतीय सेलेब्रिटी लोकांचे डोळे कधी काश्मीर कडे का गेले नाहीत जिथे लाखो निरपराध हिंदूंचा नरसंहार झाला? पाकिस्तान व बांग्लादेशातून हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या अक्षरशः दररोज बातम्या येत असताना कधी कोणता सेलिब्रिटी साधी श्रद्धांजली सुद्धा का देत नाही? हे प्रश्न त्या दुटप्पी लोकांना ठामपणे विचारायलाच हवा💯
त्याशिवाय आपलाच मुद्दा कसा खरा, आपणच कसे मानवतेचे प्रतीक आहोत हे जगाला ओरडून सांगण्याची कला हिंदूंनीही शिकायला हवी. बांग्लादेश, पाकिस्तान, काश्मीर, इस्राएल व पलेस्टिन मधल्या निरपराध मृतकांना श्रद्धांजली.
- प्रथम उवाच
0 Comments