मी Shanny आहे, मला उत्तर देऊ शकता का?

"मी शॅनी आहे. एक जर्मन टॅटू आर्टिस्ट. इस्राएल मध्ये प्रवासासाठी आले होते. इथे ज्यू आणि मुस्लिमांमध्ये युद्ध अधूनमधून होत असते. ज्यू लोकांचा हा एकमेव देश आहे, म्हणून ते स्वतःचं रक्षण करतात. स्वतःची प्रगती करतात. त्यांच्या देशावर पॅलेस्टाईन या मुस्लिम देशाचाही दावा आहे. 


पण मी न ज्यू आहे न मुस्लिम, मी ख्रिश्चन आहे. मी न इस्राएल ची आहे न पॅलेस्टाईनची. मी जर्मन आहे. थोडक्यात माझा इथे काहीच संबंध नाही. मी शांततेच्या काळात आले आणि अचानकपणे मला काही हमास या संघटनेच्या लोकांनी पकडलं, मारलं, माझा देह निर्वस्त्र केला आणि गल्लोगल्ली त्याची धिंड काढली. कोण आहे हे हमास वाले? आतंकवादी? की मुजाहिद? जे कोणी असतील, त्यांना स्वतःचा विजय व्यक्त करण्यासाठी माझं शरीर दाखवणं, त्यावर थुंकणं का महत्वाचं वाटतं? माझा नेमका अपराध काय आहे? आणि मी दोष द्यावा तरी कोणाला? 


सर्व फेमिनिस्ट लोक, मानवतावादी लोक, न्यायप्रिय लोक तर अन्यायाविरुद्ध बोलण्यासाठी तत्पर असतात ना? मी तर मानव आहे, स्त्री आहे, पण माझ्याविरुद्ध होत असलेला अन्याय अरब देशांना दिसत नाही. त्यांचं हमास ला उघड समर्थन आहे. का? फक्त हमास चे सदस्य मुस्लिम  आहेत म्हणून? पण दहशतवादाला तर धर्म नसतो ? मी जे लिबरल विचार शिकून मोठी झाले, जगले, ते सगळंच पोकळ वाटायला लागलं आहे. पण आता खूप उशीर झालाय..... "


कदाचित असाच विचार शॅनी ने आज केला असता. अशा कित्येक शॅनी रोज जिहादला बळी पडतात. पण यात जिहादच्या नावाने आंधळ्या झालेल्या लोकांपेक्षा स्वतःला सेक्युलर, मानवतावादी वगैरे म्हणणाऱ्या लोकांचा भित्रेपणा जास्त कारणीभूत आहे. जोपर्यंत पॉलिटिकल करेक्टनेस च्या आहारी जाऊन जग मूळ समस्या इग्नोर करत राहील, तोवर अशा शॅनी, साक्षी, निकिता, घडतच राहतील. 


आणि हो, आम्ही हिंदू आहोत, पूर्वी शंखनाद झाल्याशिवाय युद्ध करत नव्हतो, स्त्रीला मारत नव्हतो. नंतर शिवरायांचं ऐकून शत्रुच्या स्त्रीचाही मान राखायला लागलो. आज आम्हाला अँटी फेमिनिस्ट आणि मागास ठरवलं जातं. चालू द्या. 


- प्रथमेश चौधरी

Post a Comment

0 Comments