भाऊबीज

"द केरळ स्टोरी पाहिला होतात का रे? मी काल मोबाईल वर पाहिला" साहिलने हा प्रश्न विचारताच गृप मध्ये चर्चा सुरू झाली. 


चेतन म्हणाला "सोडा रे पिक्चर पाहणं, mock test आहे उद्या. लातूर मध्ये आलो कशाला आपण? शिकण्यासाठी की एंटरटेनमेंट साठी?" 


त्याला गप्प करत निकिता म्हणाली, "एखादा पिक्चर पाहिल्याने काही बिघडत नाही रे! पण हे सगळं सत्य घटनेवर आधारित आहे. काय अवस्था होत असेल न रे तशा मुलींची ज्यांना त्याच्याच मैत्रिणी फसवतात? लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढतात." 

निकिताने असं म्हणतात गृप मध्ये सन्नाटा पसरला. 


हे सगळं डिस्कशन झुबेदा समोर सुरू होतं. तिला काय वाटेल या विचाराने निकितासहित सगळेच अवघडले. टॉपिक कसा बदलावा या विचारात सगळे असतानाच झुबेदा बोलायला लागली...


"कित्ती आसानिसे तुम्ही लोग हे assume केलं ना, की मला जिहादी मुस्लिम मुलींबद्दल sympathy असन? त्या मदरशात तालीम घेणाऱ्या मुली असतात. तिकडे चलतात ब्रेनवॉशिंग चे कामा. आमच्या मोहल्ल्यात एक तस्लिमा दीदी बोलके रहते. 10 सालपासून तिच्यावर मदर्शात जुलम होत होते. ती चूप बसली. कारण जुलम करणारा मौलाना लातुरात 7-8 मदरसे चालवतो. मोठा इज्जतदार आहे. घरवाल्यांना तिने बोलून पाहिलं पण घरचेही भरोसा रखेना. कल परसो व्हीडिओ व्हायरल झाला. तेव्हा मोहल्ले वाल्यांनी त्याला चांगला पिटाई केला बोले. पर 10 साल! या खुदा!"


आता ही चर्चा गंभीर वळणावर होती. चेतन ने विचारलं, "तू पण तर मदर्शात जात असशील ना झुबेदा? I mean बरेच लोक रेग्युलर शाळा-कॉलेज आणि मदरसा दोन्ही करतात"


"माझ्या अब्बुला ये सब पसंद नाही. ते मुस्लिम सत्यशोधक आहेत. मी हिजाब न घालता येते ते त्यांच्यामुळेच. मला बोलतात ते, की सेक्युलर लोगांनी मौलाना म्हणजे आपले नेते हे लॉजिक बनवून ठेवले. सौताची कौम त्यांने शिकवली, पर दंगे फसाद ला घाबरून सिधा मौलनाच्या हातात आपली चाबी देऊन टाकले. तसले लोक शिकून भी काय फायदा है? तेच सुपरइस्टीशन. अब्बुला वाटते मी मौलाना पेक्षा कलाम साब नजरेपुढे ठेवावे. प्लिज मला कट्टर नको समजत जावा."


ही सगळी चर्चा राघव गंभीरपणे ऐकत होता. राघव हा जरा unusual होता. तो दोनच शब्द बोलला. "हामीद दलवाई, शमसुद्दीन तांबोळी"


झुबेदाला आश्चर्य झालं, ती म्हणाली "अब्बु यांचे नाव घेत असतात, तुला कसं माहीत?"


"ते नंतर सांगेन. झुबेदा, मुस्लिम समाजाची मजहबी पकड इतकी मजबूत आहे, की त्याच्या पलीकडे रिअल जग आहे हे फार कमी लोकांना कळतं. तू, तुझे अब्बु व असे काही लोक प्रॅक्टिकल होत आहेत, याचा फार आनंद होतो. तुझ्यासारख्या राष्ट्रप्रथम विचारांच्या मुस्लिमांना सहकार्य केलं नाही, तर सावरकर अन आंबेडकर वाचल्याचा उपयोग तरी काय? टेस्ट मुळे घरी जाऊ शकलो नाही, पण भाऊबीज मात्र साजरी करणार!"

एवढं बोलून राघवने बॅगमधलं एक पुस्तक झुबेदाला दिलं आणि तो रिव्हिजन करायला निघून गेला. खरोखर झुबेदासाठी तो दिवस विशेष होता. कारण तिच्या डोक्यात curiosity चा दिवा प्रज्वलित झाला होता. 


- प्रथमेश चौधरी


Post a Comment

0 Comments