भास्करबुवा! तुम्हाला कन्यारत्न झालंय!हे एका सेविकेने भास्करबुवांना सांगितलं. त्यांना फार आनंद झाला. मुलीचं नाव लिलावती ठेवलं. त्याकाळच्या रिवाजाप्रमाणे तिची कुंडली सुद्धा बनवण्यात आली. पण कुंडलीनुसार ही कन्या अविवाहित राहील व हिचा विवाह झाला तरी हिला कसलंच
मूलबाळ होणार नाही, असं नमूद करण्यात आलं.
ही गोष्ट बाराव्या शतकातली आहे. म्हणजे सुमारे हजार वर्षांपूर्वीची. त्याकाळामध्ये ही गोष्ट फार धक्कादायक होती पण तरीही भास्करबुवांना एक युक्ती सुचली. लिलावतीच्या लग्नाचा सर्वोत्तम मुहूर्त काढून त्याच मुहूर्तावर लग्न लावलं तर कुंडली दोशाचा प्रभाव पडणार नाही असं त्यांना वाटलं.लिलावती हळूहळू मोठी होऊ लागली. त्याकाळी 10 ते 12 हे वय लग्न करण्यासाठी योग्य समजलं जायचं. तिच्या लग्नासाठी जे जे स्थळ यायचं ते कुंडली बघून नकार देत असे. त्या काळामध्ये ज्योतिष ही गोष्ट प्रचंड महत्वाची होती. भास्करबुवांची ही मुहूर्त वाली idea प्रत्येकाला पटेलंच असे नव्हते. पण एक सुयोग्य स्थळ पाहून लिलावतीचं लग्न ठरलं.
कोणत्याही बापासाठी मुलीचं लग्न म्हणजे एक सोहळा असतो. जैय्यत तयारी करण्यात आली. त्याकाळात घडयाळ वगैरे तर नव्हते पण भास्करबुवांचा गणित व खगोलशास्त्र या विषयाचा प्रचंड अभ्यास होता. त्यातून त्यांनी योग्य मुहूर्त सांगणारे temporory घड्याळ बनवलं. तेही पाणी आणि वाटीच्या सहाय्याने. वाटीच्या तळाशी छिद्र पाडून ती वाटी पाण्याने भरून ठेवलेल्या भांड्यात ठेवली. त्या छिद्रातून जसजसं पाणी वर येईल त्याच्यावर आधारित ते वेळ मोजत असत. लग्नाच्या दिवशीही हेच घड्याळ वापरण्यात आलं. पण उत्सुतकतेपोटी लिलावतीने त्या भांड्यात वाकून पाहिलं आणि नेमक्या त्याच वेळी तिला शिंका आल्याने तिच्या नथेतला एक बारिक मणी वाटीत पडला आणि साहजिकच त्याने छिद्र ब्लॉक केलं.
ह्या गोष्टीमुळे मुहूर्त टळला आणि वरपक्ष परत फिरला. लग्न मोडलं. लिलावती फार दुःखी झाली. भास्करबुवांनाही हे पाहवेना. तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला. ते म्हणाले, "तू कोणाची सून, पत्नी नाही झालीस म्हणून काय झालं बेटा? मी तुला माझं सगळं ज्ञान देईल. अमर होशील तू! गणितज्ञ होशील तू!"
भास्करबुवांनी आपला पूर्ण अभ्यास ग्रंथरूपात मांडायचं ठरवलं. लिलावतीचं वय पाहून तिला समजेल अशा भाषेत त्यांनी तिला अंकगणित, बीजगणित शिकवायला सुरू केलं. (भारतात स्त्रियांना शिकवायचे हं त्याकाळी. फक्त dedicated syllabus वाल्या शाळा नव्हत्या. त्यामुळे इंग्रजांनी केलेला अपप्रचार डोक्यातून काढून टाका.)
तलावातले बदक, हत्तींचा कळप, देवाला वाहिलेली फुले, अशा daily life मधल्या गोष्टी वापरून भास्करबुवांनी पूर्ण गणिताचा ग्रंथ रचला! तोही मुलीला शिकवण्यासाठी! आणि त्यांनी स्वतःच्या पुस्तकाच्या पहिल्या भागाचं नाव ठेवलं "लिलावती". इंग्रजांच्या काळात काही शाळांमध्ये लिलावती ग्रंथ शिकवला जायचा. पण त्या ग्रंथात असलेली सरस्वतीची स्तुती वगैरे सेक्युलर सरकारला अणुबॉम्ब पेक्षा भयंकर वाटत असल्याने आता हे शिकवल्या जात नसेल. (आजच्या हिंदुत्ववादी सरकारचे पुरोगामी शिक्षणमंत्री भुजबळ तर शाळेतल्या शारदेच्या फोटोलाही घाबरतात. हरकत नाही, दिवस बदलतील 💯)
पण लिलावती खरोखर अमर झाली. भास्करबुवाही अमर झाले, भास्कराचार्य झाले.
कधी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावला गेलात, तर तिथून जवळच पाटणादेवीचं मंदिर आहे. ते भास्करबुवांचं जन्मस्थान आहे. शाळेत असताना एका राज्यस्तरीय GK स्पर्धेत विजय मिळवल्यावर मी माझ्या टीमसोबत तिथे गेलो होतो. तेव्हा तिथे अस्वच्छ वातावरण पाहून आम्ही आधी ते स्वच्छ करून मग देवीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा मनात आलेले विचार आजही कायम आहेत. "इंग्लंडमध्ये न्यूटन ज्या झाडाखाली बसला ते झाड सुद्धा जपून ठेवण्यात आलंय. आपण आपला वारसा जपण्यात इतके नालायक का आहोत?" विचार करा.
- प्रथमेश चौधरी
(@iampratham29)
0 Comments