अप्रिय निर्णय
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काही अप्रिय निर्णय घ्यावे लागतात. ते अप्रिय निर्णय घेण्याची प्रक्रिया कितीही किचकट वाटत असेल, तरीही ती पार पाडावी लागते.
अनेक व्यक्ती, प्रसंग, घटना, एखादी परीक्षा यांच्याशी आपण नकळत आसक्त होऊन जातो. ते घटक larger than life वाटायला लागतात. कधी मित्रांचा गृप, कधी एखाद्या ठिकाणी जाणं, किंवा काही नातेवाईक, एखादी activity हे सगळे इतके प्रिय वाटायला लागतात की त्यांच्या फक्त अस्तित्वाने आपण आनंदी असतो. मग ते अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपण धडपड करतो. कधी पैसे, कधी नैतिकता, कधी कामाचा व्याप, करियर किंवा इतर अनेक फॅक्टर्स आपल्याला त्या प्रिय घटकांच्या अस्तित्वापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतात. पण हे सगळे फॅक्टर्स सांभाळूनही आपण आपल्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या घटकांसाठी वेळ काढतोच.
पण, जर आपण हे सगळं काही ज्या प्रिय गोष्टींच्या साठी करत असतो, त्यांना आपल्या असण्या किंवा नसण्याने काही फरक पडतो का? हा विचार करणं कितीही जीवावर येत असेल तरीही ते केलंच पाहिजे.
मला पावसाळ्यात कोकणातल्या गडकिल्ल्यांवर ट्रेकवर जायला आवडतं, मी त्यासाठी saving करेल, वेळ काढेल, सुट्टी घेईल, पण पावसाळ्यात मागच्या 2 वर्षांपासून किल्ल्यांवर जाण्यासाठी बंदी येत आहे. मग माझ्या आटापिटा करण्याचा उपयोग आहे का? त्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केलेलाच बरा.
एखादी व्यक्ती आपल्याला फार जवळची वाटत असेल, तर आपण त्या व्यक्तीसाठी काही efforts घेतो. पण त्याचे त्या व्यक्तीसाठी 0 महत्त्व असेल तर? तर efforts सुद्धा 0 करता यायला हवेत. किंवा अपेक्षा 0 करता यायला हव्यात. दोन्ही पैकी एक जरी जमले, तरी मन शांत राहते. पण दोन्ही न जमल्यास मात्र माणूस एका भावनिक loop मध्ये अडकतो.
आनंद -> अपेक्षा -> दुःख -> आशा -> आनंद
हे loop फक्त सजीवांपुरतं मर्यादित नसून ध्येय, स्वप्न, वगैरे निर्जीव गोष्टींसाठी सुद्धा applicable आहे. यात आनंद सहसा सर्वात कमी वेळ अनुभवता येतो आणि अपेक्षा आणि आशा मात्र अमर्याद वेळ चालते. ही analogy गीतेतही अर्जुनविषादयोगानंतर श्री कृष्ण सांगतात. पण त्यांचा context जन्मसंसारबंधनाच्या loop चा आहे.
तरीही, या loop मधून जेवढ्या लवकर बाहेर पडता येईल तेवढं चांगलंच, पण 2-3 वेळा loop मधून pass झाल्याशिवाय ते शक्य होणं फार कठीण आहे, हे मात्र नक्की💯
- प्रथम उवाच
0 Comments