सॉरस समजून घेताना


व्हीडिओ साठी इथे क्लीक करा

बातम्यांमध्ये उशिरा का असेना, पण ओपन सोसायटी फौंडेशन चा प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती व त्याचे आंतरराष्ट्रीय कुटाणे समोर येत आहेत. भाजप, अदानी, राहुल गांधी, हे सर्व थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया.

आता विचार करा, अमेरिकेतल्या उद्योगपतीला भारतीय राजकारणात एवढा का रस आहे? त्याला भारताचाच नाही, तर जगाच्या राजकारणात रस आहे. जॉर्ज सॉरस हा व्यक्ती राष्ट्रवादाच्या विरोधात काम करतो. म्हणजे जगात राष्ट्र ही संकल्पनाच असू नये, माणसाने माणसाकडे माणूस म्हणून पहावं, देशांच्या सीमा नको, कसली बंधनं नको. किती उदात्त विचार आहेत ना?  प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे, की हा विचार स्वतःसाठी नसून इतरांसाठी आहे.

जर जगात राष्ट्रवाद नको आहे, तर कोव्हिड मध्ये लसीकरण करण्याची सुरुवात अमेरिके ऐवजी आफ्रिकेत करूया, असं ह्या संत सॉरसच्या टोळीला वाटलं का? किंवा जगाच्या कल्याणासाठी अमेरिकेत आजूबाजूचे refugee बिना Visa येऊ द्यावेत असं तरी वाटलं का? अजिबात नाही. 

स्वतःच्या देशात एअरपोर्ट वर सुद्धा धर्माच्या आधारावर वेगवेगळी चेकिंग होत असताना सॉरसरावांची गॅंग इतर देशांना मात्र सर्वधर्मसमभाव शिकवते. या नेक्सस मध्ये भारतातील अनेक राजकारणी व त्यांचे लेकरं बाळं काम करतात. अगदी मनमोहन सिंह यांची मुलगी सुद्धा ओपन सोसायटी फौंडेशनमध्ये नोकरी करत असे. चीनमध्ये या संस्थेवर लगेच बंदी आणली गेली, पण भारत अजूनही फक्त प्रेस कॉन्फरन्स, आरोप प्रत्यारोपात बिझी आहे. यावरून भारत सरकारमध्ये "वॉशिंग मशीनसाठी" आलेल्या लोकांमध्ये सॉरसचे हस्तक आहेत का अशी शंका येते.

एखाद्या देशातून राष्ट्रवादी गट सत्तेच्या बाहेर गेल्याचा सॉरस ला नेमका काय फायदा आहे? व्यक्तिशः काहीच नाही. पण सॉरस हे फक्त लेबल आहे एका जाळ्याचं त्यावर बरेच कोळी आहेत. विचार करा, राष्ट्रवादी सरकार काय काम करते? स्वदेशी मालाचा पुरस्कार करते, देशप्रेम आणि देशाभिमान वाढेल अशी राजकीय रचना करते, संस्कृतीचे पुनरुज्जीवन करते. अशीच कामं भारत सरकारनेही केली ना? मेक इन इंडिया च्या माध्यमातून भारत आता सैन्य सामग्रीच्या बाबतीत आत्मनिर्भर होतोय, vocal for local म्हणतोय, या सगळ्या व्यापारामुळे नुकसान कोणाचं होतं? 

जे विदेशी उत्पादक आधीपासून भारताला स्वतःचा माल विकत होते, त्यांना साहजिकच या धोरणाचा त्रास होणार. याउलट जर देशात non नॅशनलिस्ट सरकार असेल, त्यातल्या त्यात कोणता मोठा पक्ष न राहता 5-50 पक्ष एकत्र येऊन सरकार बनत असेल, तर कोणत्याही योजना रखडवता येतात. निवडणूकित आर्थिक लाभाच्या हिशोबाने आपले स्वार्थ साधता येतात हे विदेशी कंपन्यांना चांगलंच ठाऊक आहे. अदानी ने टेक ओव्हर करण्यापूर्वी भारतातले बहुतांश विमानतळ व बंदर विदेशी कंपन्या चालवत होत्या हा निव्वळ योगायोग कसा असू शकतो? 

जॉर्ज सॉरस हा म्हातारा भारताचं काहीही नुकसान करू शकत नाही. पण त्याच्या दुटप्पी विध्वंसक धोरणाच्या आधारावर राजकारण करणारे मात्र जास्त नुकसान करू शकतात हे लक्षात घ्यायला हवं.

✍️ प्रथम उवाच




Post a Comment

0 Comments