"अनेक देवीदेवता आहेत, मग तुला कृष्णच सर्वात जास्त का आवडतो?" ऑफिस मधून निघता निघता तिने हा प्रश्न फेकला
मी : आवडतो म्हणजे ती काय खायची गोष्ट नाहीये😂 मुळात सगळे देवीदेवता एकाच परब्रह्माचे manifestations आहेत.
ती: तसं नाही रे, तू सारखे कृष्णाचे उदाहरण देत असतो, त्यामुळे विचारलं. इतर धर्मग्रंथ वाचले का कधी?
मी: मला कृष्णाची काही वैशिष्ट्य फार आवडतात. मुळात मी अर्थासाहित सगळ्यात आधी वाचायला घेतलेलं पुस्तक म्हणजे बायबल. नंतर कुराण आणि मग गीता.
ती : सगळे समानच वाटले ना?
मी : प्रामाणिकपणे नाही. पहिले 2 वाचून तर निधर्मी होणं योग्य वाटलं. मी एक स्वातंत्र्यप्रिय व्यक्ती आहे. कोणीतरी काहीतरी सांगतोय म्हणून मी त्या कमांड ऐकायच्या हे पटत नाही मला. वरून त्या कमांड ऐकल्या नाही, किंवा अमुक अमुक देव आहे हे मानलं नाही तर दोजख/hell मध्ये जाशील वगैरे गोष्टी पाहून तर वाटलं की एवढी possesive तर गर्लफ्रेंड पण नसते. ज्याने कोणी जग तयार केलंय, त्याला काय फरक पडतो मी त्याला कोणत्या नावाने बोलवायचं आहे ते? तो इतका शक्तिशाली असून जर माझ्यासारख्या छोट्या creature च्या वागण्याने offend होत असेल तर काय कामाचं आहे हे सगळं😂 त्यापेक्षा मला कोणता धर्म नकोच. अशी विचारसरणी झाली होती.
ती : मग? कृष्णाने अशी काय जादू केली तुझ्यावर?
मी : स्वातंत्र्य दिलं. प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य. भर युद्धात तो अर्जुन back out करायचं म्हणत असतो. पहिल्या 2 ग्रंथांच्या prejudice ने विचार केला तर कृष्णाने सरळ commandment द्यायला हवी होती की "मी देव आहे, मी आदेश देतोय, चल लढ!" पण त्याने तसं नाही केलं. सगळे अर्जुनाचे प्रश्न ऐकून घेतले, मुद्देसूद उत्तरं दिली. "Convince केलं". तू माझ्यावर प्रश्न केलास, चल तुझं सर तन से जुदा… असलं कही नाही बोलला तो. त्याने फक्त कर्तव्य सांगितलं आणि ते केलं तर काय होईल ते सांगितलं, नाही केलं तर काय होईल ते सांगितलं. त्याने कसली नियमावली सांगितली नाही. अंतिम निर्णय घेण्याचं काम अर्जुनावर सोपवलं. त्याशिवाय तो प्रेमळ आहे, खोडकर आहे, संघर्ष टाळायचा प्रयत्न करणारा आहे. पण भेकड नाहीये. जिथे उपाय नसेल तिथे बिनधास्त संघर्ष, युद्ध करायला सांगतो. युद्धाचा सल्ला सुद्धा तेव्हा देतो जेव्हा स्त्रीच्या चारित्र्याचा प्रश्न असतो. त्याच्या स्वतःच्या गुस्ताखीचा नाही.
त्यामुळे fan हो गया मै❤️
ती : किती भारिये हे!!🤷♀️
हा संवाद आजूबाजूला असलेले कलीग पण ऐकत होते. खुश झाले आता त्या सगळ्यांना जन्माष्टमीला मंदिरात घेऊन जातो. तुम्ही हे share करा.
जय श्री कृष्ण🙏
✍️प्रथम उवाच
Pratham Uvaach
0 Comments